Type Here to Get Search Results !

चंदगडमध्ये महिलाराज-जिल्हा परिषद निवडणुकीत चारही गट महिला आरक्षित

 


अडकूर,कुदनूर सर्वसाधारण तर माणगाव, तुडये ओबीसी (ना.मा.प्र.),महिलांना राजकारणात मोठी संधी-स्थानिक नेतृत्वात उत्साहाची लाट


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या २०२५ च्या आरक्षण सोडतीत महिलाराज प्रस्थापित झाले आहे. या सोडतीनुसार तालुक्यातील सर्व चार गट महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे यंदा चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक पूर्णतः महिला उमेदवारांच्या स्पर्धेने रंगणार आहे.

सोडतीनुसार —


गट क्र. ६५ अडकूर हा महिला सर्वसाधारण आरक्षित झाला आहे.


गट क्र. ६६ माणगाव हा महिला ओबीसी (ना.मा.प्र.) आरक्षित झाला आहे.


गट क्र. ६७ कुदनूर हा महिला सर्वसाधारण म्हणून जाहीर झाला आहे.


तर गट क्र. ६८ तुडये हा महिला ओबीसी (ना.मा.प्र.) आरक्षित आहे.


या निकालामुळे चंदगड तालुक्यातील स्थानिक महिला नेत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. अनेक महिला सामाजिक कार्यकर्त्या, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आता जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.राजकीय विश्लेषकांच्या मते, ही आरक्षण सोडत महिलांच्या नेतृत्व विकासासाठी मोठी संधी ठरणार असून, ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.स्थानिक स्तरावर महिला नेतृत्व उभारणीची ही संधी ठरावी, अशी अपेक्षा नागरिक व सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.


पंचायत समिती गण आरक्षण सोडत (२०२५)

चंदगडमध्ये 8 पैकी 4 जागावर महिलाराज- 

गण-129- गवसे - अनुसूचित जाती महिला, 

गण 132-कोवाड - महिला -(ना मा प्र महिला)

गण-134 तुर्केवाडी-सर्वसाधारण 

गण -136 हेरे- सर्वसाधारण महिला,

गण-133-कुदनुर-सर्वसाधारण

गण-135- तुडये सर्वसाधारण महिला 

गण-130-अडकूर सर्वसाधारण 

गण-131-माणगाव ना.मा.प्रवर्ग

Post a Comment

0 Comments