चंदगड/प्रतिनिधी : आर्थिक स्वरूपात मदत करत कानडी गावाच्या तरुणाईकडून दिवंगत लोककलाकार श्रीपती कांबळे यांना खरी श्रद्धांजली देण्यात आली.आपणही माणुसकी जपत सर्वसामान्यांच्या वेदना जाणून घेत "एकमेकां साहाय्य करू" या उक्ती प्रमाणे नवा आदर्श या युवा पिढीने घालून दिला आहे.
कानडी गावातील व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या काही दिवसांत जमा झालेला ₹42,000/- इतका मदतनिधी त्यांच्या अपंग मुलांच्या भविष्यासाठी कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला.ही केवळ आर्थिक मदत नाही,तर कानडी गावच्या तरुणांच्या माणुसकीचे आणि एकतेचे प्रतीक आहे.यावेळी मदत सुपूर्द करताना ग्रुपमधील काही सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments