Type Here to Get Search Results !

विद्यापीठाला कुलगुरू नाही,हे शोभनीय आहे का?



आमदार सतेज पाटील यांनी केला संताप व्यक्त!


कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोंबर 2025 रोजी संपलेला असून यावर आज अखेर कोणताही निर्णय झाला नसल्याने विद्यापीठाला कुलगुरू नाही,हे शोभनीय आहे का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

      

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सेक्शन 11 नुसार राज्यपाल तथा कुलपती यांनी शिवाजी विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची नियुक्ती करणे आवश्यक होते.शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहिले असून याबाबत नेमकी परिस्थिती काय? या शिक्षणक्षेत्राबाबत कारणीभूत कोण आहे असा उद्विग्न सवाल काँग्रेस नेते,आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.ज्या दिवशी कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेले असते.असे असून सुद्धा पूर्ण वेळ कुलगुरूंची नियुक्तीची प्रक्रिया तर दूरच पण प्रभारी कुलगुरू सुद्धा का नियुक्त केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments