Type Here to Get Search Results !

पांगिरे येथील वर्षाराणीची एस.टी.आय पदी निवड


आजरा प्रतिनिधी : पांगिरे ता.भुदरगड येथील कन्या वर्षाराणी तुकाराम सुतार हिने एम. पी.एस.सी. च्या माध्यमातून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झालेने गावासह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तिचे शिक्षण बी. एस.सी.अँग्री पर्यंत झाले असून सन 2019 पासून सन 2025 सालापर्यंत तिने सदर परीक्षेचा खडतर अभ्यास केला.सहा वर्षाच्या कालावधीत तिने युनिक अकादमी पुणे,घरी, व बारामती येथील ट्रिक्स अभ्यासिका येथून अभ्यास केला.


2 फेब्रुवारी 2025 ला तिची पूर्व परीक्षा झाली.तर  29 जून ला तिची मुख्य परीक्षा झाली.सदर परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवले.याबद्दल तिची दत्त मंदिर,नागनाथ मंदिर,भगवा चौक मंडप ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.


तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र माझाचे प्रतिनिधी पुंडलिक सुतार व अवधूत भजनी मंडळाचे गायक कलाकार भैरवनाथ भराडे,सहकलाकार विश्वनाथ लोहार,प्रकाश लोहार,पंडित लोहार,विष्णू लोहार,संभाजी लोहार,दिलीप पाटील,तुकाराम पोवार,सुनील मातले,धनाजी जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.तर युवाशक्ती भगवा चौकचे अध्यक्ष विलास मोटे,उपाध्यक्ष दयानंद पाटील,सरपंच मारुती भराडे,उपसरपंच सुरेखा मातले व सर्व सदस्य, शिवम परिवार, यांच्यावतीनेही सत्कार झाला.मिरवणुकीसाठी भादवण येथील महिला लेझीम मंडळ व सनई वादक मारुती वाजंत्री,अरुण केंगार,सुरेश व सर्जेराव वाजंत्री यांनी सादरीकरण केले.वर्षाराणीच्या या यशात आई सुवर्णा,वडील  तुकाराम,भाऊ अमोल,वहिनी नंदिनी, कुमारी यशश्री , आजी श्रीमती शांताबाई, निवृत्ती भाटले,माजी सरपंच सर्जेराव पाटील यांचे योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments