ऍड. संतोष मळविकर यांच्या लढ्याला यश!
चंदगड,/प्रतिनिधी : चंदगडसह माणगाव आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर देणाचे आश्वासन जिल्हा उपसंचालक दिलीप माने यांनी दिली.ते माणगांव येथील आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत बोलत होते.
संतोष मळविकर यांनी माणगांव आरोग्य केंद्रातील समस्या व अपुरे कर्मचारी या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठविला होता. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नियोजनाने रविवारी सुट्टीच्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या बैठकीत संतोष मळविकर यांनी तालुक्यातील रिक्त पदे व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा जाब विचारला.यावेळी माणगाव आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर देण्याची ग्वाही जिल्हा उपसंचालक दिलीप माने यांनी दिली तसेच माणगाव आरोग्य केंद्राचा कारभार डॉ. ऋतिक पाटील यांच्याकडे देण्याचा आदेश दिला.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, डॉ. सोमजाळ यांच्यासह ऍड.संतोष मळविकर,सुनील नाडगोंडा,विश्वनाथ ओऊळकर,अनिल तळगूळकर,जयवंत सुरतकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments