स्व.मसणू सुतार यांनी तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला-गोपाळराव पाटील
नेसरी/प्रतिनिधी : "स्व.मसणू सुतार एक वादळ होतं की ज्या वादळाने आजरा तालुक्याच्या पूर्व भागासह तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला.गावागावातील वाडी वस्तीवर रस्ता तयार करून एसटी गाड्या सुरू केल्या,वाडी वस्तीवरील शाळांसाठी इमारती मंजूर करून शैक्षणिक कार्य पुढे नेण्यात मोठा हातभार लावला" असं प्रतिपादन गोपाळराव पाटील यांनी शिरसंगी येथे आयोजित केलेल्या स्व. मसणू सुतार यांच्या शोकसभेवेळी व्यक्त केले.
सुरुवातीला तुकाराम बामणे यांनी प्रास्ताविक केले.मान्यवरांच्या हस्ते सुतार यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.यावेळी अशोक चराटी यांनी सुतार यांना श्रद्धांजली वाहताना गावच्या सरपंचपदापासून ते तालुक्याचे सभापतीपर्यंत मसणू सुतार यांचा राजकीय प्रवास याबद्दल भावना व्यक्त केल्या.उमेश आपटे यांनी आपल्या सुतार यांच्या पंचायत समिती कार्यकाळातील अनुभव कथन केले,ते म्हणाले,"या विभागातील दळणवळणासाठी रस्ते बांधून माणसं जोडण्याचे कार्य सुतार यांनी केले असल्याचे नमूद करून आपल्या कै. मुकुंदराव आपटे फाउंडेशन तर्फे चल स्मारक म्हणून त्यांच्या नावे ॲम्बुलन्स देण्याची जाहीर केले.
यावेळी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी सुतार यांच्यासोबत केलेल्या कार्याचे आठवणीं ताज्या केल्या.यावेळी शिरसंगी येथील सुभाषराव देसाई, मधुकर यलगार,दिगंबर देसाई यांनी आजरा नेसरी बेळगाव रस्त्याला मसणू सुतार यांचे नाव देण्याचे आवाहन केले.सरपंच ते पंचायत समिती सभापती, दौलत साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्य केलेल्या सुतार यांनी आजरा तालुक्यातील पूर्व भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी योगदान,त्याबरोबर आजरा सिरसंगी नेसरी बेळगाव हा रस्ता पूर्ण करून दिला असल्याची आठवण व्यक्त केली.व्ही.जी कातकर यांनी गेल्या पाच दशकातील सुतार यांच्या राजकीय कार्यकाळाचा आढावा घेतला.यावेळी आजरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद सावंत यांनी सुतार हे राजकारणातील स्पष्टवक्ता व निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते असं प्रतिपादन केले.
याप्रसंगी सी.आर.देसाई,शिवाजी नांदवडेकर, दशरथ धुरे पांडुरंग लोंढे ,जे एम पाटील,विकास बागडी, बळवंत शिंत्रे मधुकर येलगार, मारुती मोरे,वसंत सुतार,शंकर कुराडे,प्रा.सुनील शिंत्रे,अभिषेक शिंपी,बाबुराव आडे,अंजनाताई रेडेकर,व्ही जी कातकर,सुरेश गिलबिले,संजय पाटील,जयवंत सुतार आदी व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संदिप चौगुले,भारतीताई जाधव,अशोक चौगुले,युवराज जाधव,सुभाष सावंत,सुरेश सावंत,प्रकाश पाटील,वसंत गुडुळकर,दादू केसरकर,बाळासाहेब दळवी यांच्यासह आजरा चंदगड गडहिंग्लज येथील कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.सूत्रसंचालन संतराम केसरकर व अरविंद भोसले यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments