Type Here to Get Search Results !

तारेवाडी-नेसरी नदीकाठी मगरीचा वावर


(शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे तारेवाडी ग्राम सुरक्षा यंत्रणेकडुन आवाहन)

 

नेसरी/प्रतिनिधी : नेसरी-डोणेवाडी दरम्यान असणाऱ्या इंजन मळा येथे ढोणेवाडी येथील शेतकरी शनिवारी सकाळी भल्या पहाटे वैरण आणण्यासाठी गेले असता त्यांना नदीकाठा शेजारी मोठी मगर दिसल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांतून खळबळ उडाली आहे.काही वर्षांपूर्वी देखील काशिलिंग मंदिराजवळ मगरीने दर्शन झाले होते.त्यानंतर पुन्हा मागील चार दिवसापासून शेतकऱ्यांना भल्या मोठ्या मगरीने नदीकाठाशेजारी दर्शन झाल्याने नदीकाठावरील नेसरी तारेवाडी,डोणेवाडी,हडलगे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


एकंदरीत सदर प्रकार गंभीर असून दक्षता घेत वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांनी शेती कामासाठी ये-जा करताना काळजी घ्यावी अशी तारेवाडी ग्राम सुरक्षा यंत्रणेकडुन उपसरपंच प्रशांत तुरटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments