Type Here to Get Search Results !

भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन बल्लाळ


चंदगड/प्रतिनिधी : माजी मंत्री भरमु आण्णा पाटील व आमदार शिवाजीराव पाटील यांचे विश्वासू सहकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


सचिन बल्लाळ यांची कामगिरी-

चंदगड अर्बन बँक अडचणीत असताना आपल्या कौशल्याच्या माध्यमातून व्हा.चेअरमन पदाच्या माध्यमातून अडचणीत असलेली बँक सुस्थितीत आणली.त्याचबरोबर चंदगड शहराचे उपसरपंच असताना विकासाभिमुख कामाच्या जोरावर शहराचा चेहरा मोहरा बदलला.पुढे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी आपल्या कार्यातून कामाचा ठसा उमटवला होता.तसेच तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत पक्षवाढीस सहकार्य केले. त्यामुळे या कार्याची पक्ष नेतृत्वाने दखल घेत त्यांची उपाध्यक्षपदी निवड करत जिल्हा पातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यासाठी त्यांना खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक,माजी आमदार संजय घाटगे,जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments