(औषधी गुणधर्म असलेल्या मेंढीच्या दुधाने कर्करोगावर उपचाराची शक्यता-संशोधनातून निष्पन्न,माडग्याळ संकरामुळे मूळ कोल्हापुरी मेंढीचा अस्तित्व धोक्यात; शासनाने तात्काळ संवर्धनाचे पाऊल उचलावे)
चंदगड/प्रतिनिधी : कोल्हापुरी-दख्खनी नावाने ओळखली जाणारी राज्यातील अद्वितीय मेंढी जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या मेंढीच्या संवर्धनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी महामंडळाने तातडीने पुढाकार घेऊन राज्यातील महामंडळाच्या प्रक्षेत्रावर तिचे संगोपन व संवर्धन करावे, अशी मागणी ‘यशवंत क्रांती’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.
कोल्हापुरी मेंढी ही अतिपावसाच्या वातावरणात टिकणारी, जुळे तिळे कोकरे देणारी आणि औषधी गुणधर्म असलेले दूध देणारी दुर्मिळ जात मानली जाते. संशोधनानुसार या मेंढीच्या दुधातील घटक कर्करोगासारख्या आजारांवरही प्रभावी ठरू शकतात.परंतु माडग्याळ आणि इतर जातींशी होत असलेल्या संकरामुळे या मूळ जातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोल्हापुरी मेंढीचे संगोपन, जतन व संवर्धनासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments