कोल्हापूर/प्रतिनिधी- तृतीयपंथी समुदायाला भेदभाव,गरिबी,सामाजिक बहिष्करण, नोकरी मिळविण्यात अडचणी अशा समस्यांना सामोरे जावे लागते.तसेच या समस्यांमुळे त्यांच्या मूलभूत हक्कांपासून ते रोजच्या जगण्यापर्यंत अनेक अडचणी येतात. तथापि तृतीयपंथीयाना रोजगाराचे साधन आणि हक्काचे रेशन शिधावाटप केंद्र मिळावे यासाठी मैत्री संघटन या तृतीय पंथीय संघटनाने राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती.त्यांनतर अध्यक्ष राज्य अन्न आयोग यांचे सूचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवून कोल्हापूर शहर मध्ये महाराष्ट्रात प्रथमच नवीन दुकानासाठी तृतीयपंथी मैत्री संघटन यांची निवड केली आणि आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या उपस्थितीत मयुरी आळवेकर यांना हा परवाना देण्यात आला.याप्रसंगी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments