Type Here to Get Search Results !

तरुणीच्या अपहरण प्रकरणी चंदगडच्या दोन महिलांना अटक


उपसंपादक/भरमु शिंदे-क्राईम वृत्त : चंदगड तालुक्यातील महाविद्यालयीन शिकणाऱ्या तरुणीचे अपहरण करून तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उलटून लावला.तरुणीचा व तिच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चंदगड तालुक्यातील दोन महिलांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली.रमीजा अझरुद्दीन भागवाण (वय 35 आझादनगर,चंदगड ) यास्मिन मोहम्मदहुसेन शहा ( वय 42 रविवार पेठ, चंदगड ) अशी आरोपिंची नावे आहेत. या प्रकरणातील तन्वीर नामक संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.

         

पोलिसाना मिळालेली माहितीनुसार गुरुवारी संकेश्वर - बांधा महामार्गावरील गडहिंग्लज तालुक्यातील एका गावातून पीडित तरुणीचे अपहरण केले असता तरुणीने आरडाओरडा करताच तोंड दाबून कारमध्ये कोंबून तिला बेळगावला नेले.तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून देण्याचा त्यांचा डाव होता.परंतु पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी सीसीटीव्ही फुटेज वरून त्या कारचा तात्काळ शोध घेतला व हा त्यांचा डाव पालटून लावला बेळगावला जाऊन तिला सुखरूप ताब्यात घेऊन पीडितेला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

   

तरुणीच्या फिर्यादीवरून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करून पाहणारा इजाज मजीद शेख (वय 32), त्याचा भाऊ आसिफ मजीद शेख( वय 28 राहणार दोघेही हेरे ) यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सोमवारी ( 17) पोलीस कोठडी दिली.अपहरणासाठी  वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केली आहे.

Post a Comment

0 Comments