Type Here to Get Search Results !

चंदगड मध्ये भाजपची रणनीती ठरली,अखेर सर्व उमेदवार जाहीर


चंदगड नगरपंचायतीसाठी भाजपचे उमेदवार रिंगणात

     

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड नगरपंचायत निवडणुक २०२५-२९ साठी भारतीय जनता पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असुन आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर केली.यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत चंदगडमध्ये परिवर्तन घडवून 'कमळ' फुलवण्याचा निर्धार केला.


   

आमदार पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार नगराध्यक्ष पदाचे सर्वसमावेशक उमेदवार म्हणून  सुनिल सुभाष काणेकर यांच्या नावावर सर्वांनुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. तर प्रभाग -1 मधून सौ. जयश्री रामा जुवेकर, प्रभाग- 2 मधून श्री. चेतन व्यंकटेश शेरेगार, प्रभाग- 3 मधून श्री. अबुजर अब्दुलरहीम मदार, प्रभाग- 4  मधून सौ. आयेशा समीर नाईकवाडी, प्रभाग- 5 मधून श्री. शकील कासीम नाईक, प्रभाग- 6 मधून श्री. तजमुल सलीम फणिबंद, प्रभाग- 7 मधून श्री. धीरज शामसुंदर पोशिरकर, प्रभाग- 8  मधून सौ. वैष्णवी सुनिल सुतार, प्रभाग- 9 मधून  सौ. शितल अनिल कट्टी, प्रभाग- 10 मधून सौ. माधवी उमेश शेलार, प्रभाग- 11 मधून श्री. सचिन निंगाप्पा नेसरीकर, प्रभाग- 12मधून सौ. आसमा असीफ बेपारी, प्रभाग- 13 मधून सौ. सुचिता संतोष कुंभार, प्रभाग-14 मधून सौ. गायत्री गुरुनाथ बल्लाळ, प्रभाग- 15मधून  श्री. संदीप गोपाळ कोकरेकर, प्रभाग- 16 मधून सौ. एकता श्रीधन दड्डीकर, प्रभाग- 17मधून  श्री. सचिन सुभाष सातवणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

       

यावेळी दिपक पाटील, शांतारामबापू पाटील,  नामदेव पाटील, जि प चे माजी सदस्य सचिन बल्लाळ,  विशाल बल्लाळ ,  संजय गांधी निराधार योजनेचे अद्यक्ष लक्ष्मण गावडे, अशोक कदम, प्रताप सुर्यवंशी, सुरेश सातवणेकर,  संग्राम अडकुरकर, अमेय सबनीस, विजय कडुकर , परशराम गावडे, सौ.भारती जाधव,  गुरुनाथ बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments