Type Here to Get Search Results !

अश्विन भुजंग फाऊडेशनकडून पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सोहळा उत्साहात संपन्न

 


उत्तूर प्रतिनिधी : अश्विन भुजंग फाऊडेशनचा उत्तूर येथे पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन पोवार,स्वागत-फौंडेशनचे संचालक सुरज जाधव तर उदघाटन सरपंच किरण आमणगी यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा नेते राहुल आर आर पाटील यांनी उपस्थिती लावली.


उत्तूरचे सरपंच आमंणगी म्हणाले,अश्विन भुजंग फाउंडेशन ग्रामीण भागात तरुणांना व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम करत सामाजिक बांधिलकी जपतात.



या पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष  युवा नेते राहुल आर.आर.पाटील म्हणाले,या पुरस्कार सोहळ्याने आर.आर.आबांच्या विचारांचा वारसा जपला आहें असून अश्विन भुजंग फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे.यापुढेही आर.आर.पाटील यांचे वारस म्हूणन आमचे नेहमीच सहकार्य  राहील.


कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरण युवा नेते राहुल आर. आर. पाटील यांच्याहस्ते तर अश्विन भुंजग फाऊंडेशनचे संस्थापक  अश्विन भुंजग,शिवलिंग सन्ने,विठठल उतूरकर,शिरीष देसाई उपसभापती पं सं आजरा,विठ्ठल उत्तूरकर, महेश कंरबळी ग्रामपंचायत सदस्य उत्तूर, पांडुरंग रावण सदस्य ग्रामपंचायत जाधेवाडी, शंकर  कोरवी चंदगड, कृष्णा  बामणे कोवाडे यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.


माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर.आर.(आबा )पाटील यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार खालील प्रमाणे देत मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. 

  

1)आदर्श शेतकरी  मार्गदर्शक  पुरस्कार-वसंतराव तारळेकर माजी सरपंच,चिमणे

2) आदर्श समाजभूषण पुरस्कार-डॉ सचिन  पोवार

3)आदर्श शिक्षक पुरस्कार-संतोष  शिवणे 

4)आदर्श वैद्यकीयदूत पुरस्कार-डॉ रविकांत शर्मा

 5)आदर्श शिक्षक पुरस्कार-राजेंद्र सुतार गडहिंग्लज


हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी फौंडेशनच्या उपाध्यक्षा पदमजा भुंजग,संचालक विलास सावंत, सूरज जाधव,आनंदा गाडीवडर, संदीप बारंगुळे, मनोहर कुंभार,  दिगंबर जाधव, यांनी योदान दिले.तर नंदकुमार निळखंट एन के बाबा ,गणपती नागरपोळे, केंद्र शाळा मुख्याध्यपक बाळगोंडा कोकितकर,यल्लापा कांबळे, वैजयता  जाधव, मनिषा कांबळे यांच्या सह विद्यार्थी, पालक,शिक्षक, युवक व उत्तूरसह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन दिनकर खवरे व आभार संस्थापक अश्विन भुंजग यांनी मानले.

Post a Comment

0 Comments