Type Here to Get Search Results !

दि.न्यू.इंग्लिश स्कूल व न.भु.पाटील ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न



चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनिअर कॉलेज व दि. न्यू. इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या चार दिवसापासून कॉलेजच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक ॲड.प्रा.एन. एस. पाटील यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एल.डी.कांबळे होते.                                     


प्रास्ताविक प्राचार्य आर.पी.पाटील यांनी केले.यावेळी बोलताना ॲड.एन.एस.पाटील म्हणाले की, शाळा ही केवळ पुस्तकांचे शिक्षण देणारी संस्था नसून खेळांच्या माध्यमातून जीवनाची कला शिकवणारे केंद्र असल्याचे सांगितले. तर संस्थेचे संचालक व माजी सचिव प्रा.आर.पी.पाटील यांनी चांगले आरोग्य, आनंद आणि यश प्राप्त करायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाडू वृत्ती जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव इंजिनीयर एम.एम.तुपारे यांच्या हस्ते करण्यात आले.  


क्रीडाशिक्षक टी.व्ही.खंडाळे यांनी सर्व विद्यार्थी व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसंदर्भात शपथ दिली.यावेळी संस्थेचे खजिनदार अनंत सुतार, ज्येष्ठ संचालक शामराव मुरकुटे उपस्थित होते.यावेळी चार दिवस सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एन.डी.हदगल, टी.व्ही.खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, हॉलीबॉल, रिले, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. 




यामध्ये बहुसंख्य खेळाडूंनी भाग घेऊन उज्वल यश संपादन केले. यावेळी झालेल्या कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात बारावी सायन्स अ प्रथम क्रमांक, अकरावी कॉमर्स अ द्वितीय क्रमांक, मुलींमध्ये अकरावी सायन्स प्रथम, बारावी कॉमर्स अ द्वितीय.  हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात अकरावी सायन्स ब प्रथम, बारावी सायन्स द्वितीय, मुलींच्या गटात बारावी सायन्स प्रथम, अकरावी सायन्स द्वितीय. तर 100 मीटर धावणे मुलांमध्ये ओमकार गावडे प्रथम, शुभम मसकर द्वितीय, सारंग किरमटे तृतीय, मुलींमध्ये सानिका फाटक प्रथम, तेजस्विनी गुरव द्वितीय, कादंबरी कालेलकर तृतीय,अस्मिता नाईक उत्तेजनार्थ. 200 मीटर धावणे स्पर्धेत मुलांमध्ये ओमकार गावडे प्रथम, सारंग किरमटे द्वितीय, शुभम मसकर तृतीय, मुलींमध्ये जैनब मुल्ला प्रथम, कादंबरी कालेलकर द्वितीय, सानिका फाटक तृतीय, स्वरांजली कुंभार उत्तेजनार्थ. 400 मीटर धावणे मुलांमध्ये ओंकार गावडे प्रथम, अमोल पाटील द्वितीय, तेजस घोडेकर तृतीय, मुलींमध्ये कामाक्षी देसाई प्रथम, नूतन दळवी द्वितीय, सायली पाटील तृतीय, सायली चांदेकर उत्तेजनार्थ. 800 मीटर धावणे मुलांमध्ये शुभम मजकर प्रथम, अमोल पाटील द्वितीय, श्रीधर पाटील तृतीय. मुलींमध्ये सानिका फाटक प्रथम, सायली चांदेकर द्वितीय, तेजस्विनी गुरव तृतीय, अस्मिता नाईक उत्तेजनार्थ. 1500 मीटर धावणे स्पर्धेत मुलांमध्ये प्रशांत गावडे प्रथम, जयदीप जाधव द्वितीय, संदेश कांबळे तृतीय, मुलींमध्ये समृद्धी पाटील प्रथम, दिव्या ठेपे द्वितीय, रोहिणी कांबळे तृतीय, अस्मिता नाईक उत्तेजनार्थ. 3000 मीटर धावणे मुलींमध्ये अस्मिता नाईक प्रथम, रोहिणी कांबळे द्वितीय. 5000 मीटर धावणे मुलांमध्ये महेश पाटील प्रथम, दिग्विजय गावडे द्वितीय, रवी तपली तृतीय. रिले धावणे स्पर्धेत मुली अकरावी सायन्स अ ब प्रथम, अकरावी सायन्स द्वितीय,अकरावी आर्ट्स कॉमर्स तृतीय, भालाफेक स्पर्धेत मुलांमध्ये शिवराज पाटील प्रथम, श्रीधर पाटील द्वितीय, कुशल हिरेमठ तृतीय, मुलींमध्ये जैनब मुल्ला प्रथम, रिया सांबरेकर द्वितीय, ऋषदा अत्तार तृतीय, गोळाफेक स्पर्धेत मुलांमध्ये सार्थक भादवणकर प्रथम, शिवराज पाटील द्वितीय, कुशाल हिरेमठ तृतीय, मुलींमध्ये रिया सामरेकर प्रथम, जैनब मुल्ला द्वितीय,  ऋषदा अत्तार तृतीय. थाळीफेक स्पर्धेत मुलांमध्ये सार्थक भादवणकर प्रथम, अमोल पाटील द्वितीय, शिवराज पाटील तृतीय. मुलींमध्ये जैनब मुल्ला प्रथम, रिया सांबरेकर द्वितीय, कस्तुरी गावडे तृतीय. आदी खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले. 


यावेळी पंच म्हणून प्रा.बी.सी.शिंगाडे, प्रा.एस.व्ही. बेनके, प्रा.अशोक नांदवडेकर, प्रा.अशोक नाडगौडा, प्रा.दीपक कांबळे, प्रा.सलीम शेख, प्रा.ज्योतिबा तेजम, प्रा.डी.व्ही.शिंदे, प्रा.उदय बोकडे, प्रा.विक्रम माडखोलकर,प्रा.विक्रम बोकडे, अविनाश पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.ए.डी.धायगुडे यांनी निवेदन केले. तर शेवटी प्राचार्य आर.पी.पाटील व उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments