सावंतवाडी/प्रतिनिधी : सावंतवाडी येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने परिषद पार पडली.शक्तीपीठ महामार्गविरोधी भूमिका व येणाऱ्या अडचणी, त्याचे दुष्परिणाम याबद्दल विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सरकार आपल्यावर शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयन्त करतंय,आपण शेतकरी बांधव हा प्रयन्त हानून पाडू असा नारा देण्यात आला.
सदर परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख कॉम्रेड संपत देसाई,माजी आमदार वैभव नाईक,गिरीश फोंडे, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील,कॉम्रेड सम्राट मोरे,परिषदेचे निमंत्रक डॉ. जयेंद्र परुळेकर,सहनिमंत्रक सतीश लळीत,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा. काझी,सावंतवाडी पंचायत समितीचे माजी अध्यक्ष भगवानराव देसाई,तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments