कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाकडून आमदार शिवाजीराव पाटील यांना विविध मागण्यांचे देण्यात आले निवेदन!
मुंबई/प्रतिनिधी : मुंबई येथील ना. म. जोशी मार्गांवरील दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सव समारंभाला आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपस्थिती लावली.यावेळी डिलाईल रोड येथे आमदार पाटील यांना काही नागरिकांनी भेट देत "सह्याद्री एक्स्प्रेस व वंदेभारत ट्रेन"लवकरात लवकर चालु करण्यात यावी या मागणीसह आदी मागण्यांचे निवेदन दिले.
याप्रसंगी ऍड.चंद्रकांत निकम (अध्यक्ष),जोतिबा जाधव( संचालक),सतिश सुतार आणि आजरा बँकेचे सभासद व कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागण्या-
1)सह्याद्री एक्सप्रेस मुंबई-कोल्हापूर रेल्वे पुन्हा सुरु करावी
2)पनवेल-पुणे-कोल्हापूर नवीन रेल्वे सुरु करावी
3)मुंबई कोल्हापूर वंदे मातरम एक्सप्रेस सुरु करावी
4)सुट्टीकालीन अतिरिक्त रेल्वे सेवा जादा सुरु करावेत
5)कोल्हापूर-चंदगड-बेळगाव नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे
6)सावंतवाडी-चंदगड-बेळगाव रेल्वेसाठी आर्थिक पाठपुरावा करावा
7)कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठी आर्थिक पाठपुरावा करावा

Post a Comment
0 Comments