Type Here to Get Search Results !

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी चंदगड तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड



मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे यांचा भ्रष्टाचाराविरुद्ध झंझावाती लढ्याचा संदेश,चंदगड तालुका समितीचा निर्धार-“भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी झटू”


चंदगड : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या चंदगड तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड आज कोल्हापूर येथे करण्यात आली. या निवड प्रक्रियेस महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.


तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर यांच्या शिफारशीनुसार नव्या कार्यकारिणीची निवड मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे साहेब आणि जिल्हाध्यक्ष कयेश पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे (ID Cards) प्रदान करण्यात आली.


या कार्यक्रमास जिल्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष विपुल कांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, जिल्हा सचिव सचिन बांदेकर, शहराध्यक्ष सलमान पठाण, हातकणंगले तालुकाध्यक्ष इमरान मोमीन, धनंजय सराटे व गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी धीरज रुकडे साहेबांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की,


> “भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. ती तळागाळापर्यंत पोहोचली असून, तिचा नायनाट करणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी निस्वार्थपणे झोकून देऊन काम करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सज्ज राहावे.”


त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला.

चंदगड तालुका कार्यकारिणी (नवीन नियुक्त पदाधिकारी)


बापूसाहेब शिरगावकर – तालुकाध्यक्ष


विठ्ठल कोठारी – उपाध्यक्ष व कानूर विभाग प्रमुख


सुरेश दळवी – सचिव व पाटणे विभाग प्रमुख


विलासकुमार विंजणेकर – नागनवाडी विभाग प्रमुख


संजीत मटकर – अडकूर विभाग प्रमुख


मनोज कांबळे – हलकर्णी विभाग प्रमुख


सुरेश गावडे – तुडये विभाग प्रमुख


ज्ञानेश्वर गावडे – उपविभाग प्रमुख (कानूर)


रणजीत गावडे – उपविभाग प्रमुख (कानूर)


प्रताप डसके – विभाग प्रमुख (कोवाड)



सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारण्याचा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा निर्धार चंदगड तालुका समितीने केला आहे. या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून “भ्रष्टाचारमुक्त चंदगड” हा संदेश समाजात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments