आजरा/प्रतिनिधी : आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आजरा परिवर्तन विकास आघाडीची घोषणा केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदाच्या 15 जागा लढविल्या जाणार आहेत.या सर्व उमेदवारांची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी बोलताना आघाडीचे प्रमुख अभिषेक शिंपी व कॉ. संपत देसाई म्हणाले कि,"लोकाभिमुख कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास हा अजेंडा घेऊन आजरा परिवर्तन विकास आघाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. हूकूमशाही आणि मनमानी कारभाराला वैतागली आजरा शहरातील सुज्ञ जनता या पंचवार्षिक निवडणुकीत आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या मागे ठामपणे उभा राहील, याची आम्हाला खात्री आहे."
"जनतेच्या याचं विश्वासाच्या आधारावर लोकाभिमुख, स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास ही भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीत आजरा परिवर्तन विकास आघाडी म्हणन उतरलो आहोत. आजरा शहराची नगरपंचायत झाल्यानंतर इथल्या जनतेने ज्या विश्वासाने नगरपंचायतीची सत्ता सत्ताधारी आघाडीकडे सोपवली होती, त्या जनतेच्या विश्वासाला सत्ताधारी नेतृत्वाने हरताळ फासला आहे. मनमानी कारभार आणी बगलबच्च्यांचे हित हाच या मंडळींचा एकमेव अजेंडा राहिला आहे. म्हणूनच या निवडणुकीत आजरा शहराच्या विकासाचे नवे प्रारूप मांडून आम्ही मतदारांच्याकडे जाणार आहोत. स्वच्छ हवा, समृध्द निसर्ग आणि मुबलक पाणी असतानाही केवळ विकासाभिमुख राज्यकीय इच्छाशक्तीचा अभाव यामळे या शहराचा विकास रखडलेला आहे. 'सुंदर आजरा,समृध्द आजरा' हा आमचा अजेंडा असून विकासाचे नवे प्रारूप घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत."
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय सावंत,माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, अमानुल्ला आगलावे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी रवींद्र भाटले, किरण कांबळे, उत्तम देसाई, अशोक जांभळे, इब्राहिम इंचनाळकर, दत्ता पाटील, दयानंद भोपळे, वैभव सावंत यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्ष : संजय संभाजी सावंत (काँग्रेस)
प्रभाग एक : भैरवी राजेंद्र सावंत (काँग्रेस)
प्रभाग दोन : संभाजी दत्तात्रय पाटील (शिवसेना ठाकरे गट)
प्रभाग तीन : सुमैय्या अमित खेडेकर (काँग्रेस)
प्रभाग चार : मुसासरफराज इस्माईल पटेल (काँग्रेस)
प्रभाग पाच : जस्मिन मोहम्मद इरफान सय्यद (काँग्रेस)
प्रभाग सहा : साधना अमोल मुरुकटे (काँग्रेस)
प्रभाग सात : कलाबाई शंकर कांबळे (काँग्रेस)
प्रभाग आठ : असिफ मुनाफ सोनेखान (काँग्रेस)
प्रभाग नऊ : रेशमा नौशाद बुड्डेखान (काँग्रेस)
प्रभाग दहा : निस्सार सबदारअली लाडजी (काँग्रेस)
प्रभाग अकरा : आरती दीपक हरणे (काँग्रेस)
प्रभाग बारा : समीर विश्वनाथ गुंजाटे (काँग्रेस)
प्रभाग चौदा : अभिषेक जयवंत शिंपी (काँग्रेस)
प्रभाग सोळा : मीनाक्षी संतोष पुजारी (शिवसेना ठाकरे गट)
प्रभाग सतरा : सरिता अमोल गावडे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

Post a Comment
0 Comments