Type Here to Get Search Results !

स्वच्छ चारित्र्य व समाजासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत प्राधान्य दिले जाईल-माजी आमदार राजेश पाटील


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की,


"माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात चंदगड मतदारसंघात तब्बल १६०० कोटी रुपयांची विकासकामे केली.रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, सिंचन असे भरीव काम केल्यानंतरही जनता निराश करत असेल, तर माझी चूक काय? कोट्यवधी रुपयांची कामे झाली, पण तरीही विरोधकांच्या चुकीचा प्रचाराला जनता बळी पडली.आजच्या स्थितीमध्ये माणुसकी, विश्वास आणि प्रामाणिकपणा यापेक्षा पैशांपेक्षा मूल्य अधिक मिळू लागले. भविष्यात या सर्व गोष्टींचे समाजात वेगळे पडसाद उमटतील अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याच्या,समाजासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


या मेळाव्यात भरमाण्णा गावडे, अरुण सुतार, तुडयेचे सरपंच विलास सुतार, सुरूते सरपंच मारुती पाटील,सुरेश पाटील,पांडुरंग बेनके,आर. बी. पाटील,हर्षवर्धन पाटील,नेमाना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments