चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे–शेवाळे येथे १ कोटी १९ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते म्हणाले कि,चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन सातत्याने काम करतो आहे.राजकारण बाजूला सारून येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या साक्षीने मतदारसंघाचा शाश्वत विकास पहायला मिळेल असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला.हा कार्यक्रम सोहळा प्राथमिक शाळा, नांदवडे येथे पार पडला.
या विकासकामांमध्ये प्राथमिक शाळेसाठी 70 लाख 35 हजार निधी मंजूर आहे. तर बालविकास व पोषण विभागासाठी आमदार स्थानिक डोंगरी विकास योजनेतून नवी अंगणवाडी बांधकामासाठी 12 लाख 65 हजारांचा निधी मंजूर आहे. तसेच ग्रामसुविधा यासाठी मातोश्री ग्राम समृद्ध शेतपानंद रस्ते योजनेतून 18 लाखाचा निधी मंजूर आहे. त्याचबरोबर दलित वस्ती सुधार योजनेतून 8 लाख 50 हजार निधी मंजूर आहे. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2025–26 मधून 10 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमप्रसंगी शांताराम (बापू) पाटील, दिपकदादा पाटील, सचिन बल्लाळ, लक्ष्मण गावडे, विशाल बल्लाळ, अशोक कदम, संजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळा कमिटी अध्यक्ष संपत पेडणेकर, उपाध्यक्ष माधवी गावडे यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्वागत केले.यावेळी सरपंच राजेंद्र कांबळे, सुधाकर पाटील, नामदेव कांबळे, भरत पाटील, सखाराम कुट्रे यांच्यासह गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, भाजपा बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपर वॉरीअर्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिवसभरातील घडामोडी मध्ये नांदवडे, आसगाव,करंजगाव यासंह 11 गावामध्ये भेटी देऊन विविध विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी गावा-गावामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला.


Post a Comment
0 Comments