एम. के.सावंत महाराज म्हणून त्यांची ओळख
आजरा/प्रतिनिधी : शिनोळी खुर्द ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक, वै.ह.भ.प.मारुती खेमाना सावंत वय 81 वर्षे यांचे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांचा अल्प परिचय थोडक्यात.
ह.भ.प.स्व. मारुती सावंत यांचा स्वभाव साधा,मनमिळावू व प्रेमळ असा होता.ते पंढरीच्या पांडुरंगाची 30 वर्षापासून आषाढी वारी करीत असत.ते संत भजनी मंडळाचे सेक्रेटरी म्हणून खुप वर्ष काम करत होते व मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता त्यांचे शिक्षण जुनी दहावी पर्यंत झाले होते.तर सुंदर व बहारदार आवाजात किर्तन व प्रवचन ते करीत व भजनही म्हणत असत.त्यांच्या घरी भजनाची परंपरा पहायला मिळते. त्यांना शेतीची व धार्मिक व इतर पुस्तके वाचनाची खूप आवड होती.सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.घरी येणाऱ्या सर्वांचे ते आदराने स्वागत करीत असत.अखेरपर्यंत ते निरोगी आयुष्य जगले.कुटुंबातील सर्वांना चांगले शिकवून सर्वांना स्वतःच्या पायावर उभे केले.लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना ते सन्मानाने वागवत असत.त्यांच्या अचानक जाण्याने गावासह ,पंचक्रोशीतशोककळा पसरली आहे.त्यांचे दिवस कार्य बुधवार दि.25 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे.
ऋण निर्देश -
ह.भ.प.श्री .मारुती खेमाना सावंत वय 81 वर्षे यांचे रवीवार दि.16 नोव्हेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार,वारकरी संप्रदाय, शैक्षनिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर , सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य , गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य,यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा सावंत परिवार ऋणी आहे.
शोकाकुल परिवार
मुलगा खेमाना मारुती सावंत,
सून सौ.रेखा सावंत
नातवंडे. प्रतीक सावंत पूजा सावंत, ज्ञानेश्वर सावंत काजल सावंत,श्लोक, प्रीतम
मुली सौ. सुरेखा परशराम
कोनेवाडकर रा. तडशीनहाळ,
सौ.मीरा रामू लुम्याचे रा.यमकनमर्डी ,
सौ.कल्पना मोनाप्पा सावी रा. बीजगर्णी.
समस्त सावंत परिवार शिनोळी खुर्द ता.चंदगड.

Post a Comment
0 Comments