Type Here to Get Search Results !

चंदगड शहराच्या विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना संधी द्या

 


काम करत आलोय,काम करत राहू-दयानंद काणेकर


चंदगड/प्रतिनिधी : चदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक दयानंद काणेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडी पॅनेलकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय तर या आघाडीकडून 17 कार्यक्षम नगरसेवक उमेदवार देण्यात आले असून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून चंदगड शहराच्या विकासाला गती देऊ अशी प्रतिक्रिया संजय चंदगडकर यांनी दिलीय.


दयानंद काणेकर यांच्या नेतृत्वात प्राची काणेकर यांनी मागील 5 वर्षामध्ये अनेक लोकोपयोगी धाडसी निर्णय घेत चंदगड शहरात विविध विकासकामे मार्गी लावली.त्यामुळे येणाऱ्या काळातही उपमुख्यमंत्री अजित पवार व नेते राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला प्राधान्य देऊ.




या राजर्षी शाहू विकास आघाडीमध्ये सुधा गुरबे,सुधीर पिळणकर,फिरोज मुल्ला,रिजवाना नाईकवाडी,नविद अत्तार,सिकंदर नाईक,प्रमोद कांबळे,जयश्री वनकुद्रे,संगिता चौकुळकर,प्रियंका परिट,सुभाष गावडे,सानिया आगा,इंदू कुंभार,प्रेरणा हळदणकर,प्रसाद वाडकर,शितल गुळामकर,संतोष हाजगुळकर हे उमेदवार असून त्यांना विजयी करा.आम्ही नेहमी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे  समाजसेवा करत,काम करत आलोय,आणि यापुढेही काम करत राहू,चंदगड शहराचा शास्वत विकासासाठी आमच्या सर्व उमेदवारांना पाठबळ द्या असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दयानंद काणेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments