Type Here to Get Search Results !

भाजपकडून चंदगड नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ!


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ )  चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ माजी रोहयो मंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगडचे ग्रामदैवत श्री रवळनाथ देवाचे दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराची औपचारिक सुरुवात केली.


या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महायुती झाल्याने चंदगड मध्ये राजकीय वातावरणाला नवीन दिशा मिळाली आहे. यावेळी बोलताना आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड शहरात भारतीय जनता पार्टीला शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ मिळाल्याने महायुतीची सत्ता नक्कीच येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. 




या कार्यक्रमासाठी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, सुरेश सातवणकर सचिन बल्लाळ, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी, महायुतीचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments