आजरा प्रतिनिधी : माणगाव ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक कै.विरभद्र साताप्पा पाटील गुरुजी वय 86 वर्षे यांचे रविवार दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने पहाटे 03 वाजून 20 मिनिटांनी निधन झाले.त्यांचा अल्प परिचय थोडक्यात.
स्व. विरभद्र पाटील तथा वि.सा.पाटील गुरुजी धनवान जमीनदार कुंटूबात जन्माला आले. पंचक्रोशीत *बाबू गावडा* या नावाने ते परिचित होते. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे.मितभाषीय, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, सर्वांशी गोडी गुलाबीने बोलणारे,वागणारे,दानशूर असे ते व्यक्तिमत्व होते.
त्यांना दोन कर्ते मुलगे त्यामध्ये एक डॉ. सजीव पाटील आशीवार्द हॉस्पिटल च्या माध्यमातून जनतेची वैद्यकीय सेवा करीत आहेत व अलिकडे त्यांच्या कार्याची दखल घेवून सिनेतारका अलका कुबल यांचे हस्ते उत्कृष्ट *चंदगडी डॉक्टर रत्न* म्हणून सन्मानित केले आहे. दुसरा मुलगा सुनिल पाटील यांनी इंजिनियरींग केले पण नोकरीत समाधान न मानता शेतीसारखा विषय निवडून त्यामध्ये इतका जम बसवला की आजूबाजूच्या तालुक्यातून त्यानी तयार केलेली भात, मिरची, ऊस, टॉमेटो, झेंडू इत्यादी रोपाची मागणी आणि त्यानी तयार केलेला आशीर्वाद फार्म तेथे लोकांना मिळणारा रोजगार याबदल भरभरून बोलणारे गुरुजी अभिमाने आपल्या मुलांचे कौतुक करताना पाहिले की त्यांच्या मध्ये असणारे समाधान दिसून यायचे. तीन कन्या, पत्नी, सुना, नातवडे असा सुखी - समाधानी गुरुजीचा परिवार.
माणगावचे गावडे घराणे म्हणजे गावतील सर्व दैवाचे प्रमुख देवाला गाराणा घालण्याचा मान त्यांचाच त्यामध्ये गुरुजीनी घातलेला गाराणा ऐकूण साक्षात देवपण मंत्रमुग्ध व्हावेत असा असायचा. कधी ही आपल्या कर्तव्या पासून पळ न काढता प्रामाणिक पणे काम करणारे एक अजातशूत्र असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबू गावडा. गुरुजीची शरीरयष्टी धिप्पाड, जेमतेम उंची, हसतमुख चेहरा,नेहमी नेहरू शर्ट पायजमा असा पांढराशुभ्र पोशाख, साधी राहणी उच्च विचारसरणी,असे व्यक्तिमत्व.ते लिंगायत पण सर्व जाती धर्माचे भेदभाव मानत नसत.सर्वांशी ते आदराने वागत असत.तसेच त्यांच्या कडे नेहमी पहिल्यापासून गल्लीतील माहिलांचा शेती कामासाठी राबता असायचा.कधी त्यांची पिळवणूक न करता सन्मानाची वागणूक देऊन कामकाज करून आठवड्याला मोबदला द्यायचे.अनेकांनी त्यांच्याकडे मोलमजूरी आपले संसार उभे केले . आपल्याकडे आलेल्यांना मोलाचे मार्गदर्शन शेती असो कि शिक्षण. मुलाना जवळ घेऊन आपलेपणाने शिक्षणात रूची निर्माण केली . शिक्षणात तर त्यानी कमवा व शिका हा मूलमंत्र आपल्या विद्यार्थांना दिला आणि अनेक विद्यार्थ्यांनी तो शिरोधार्य मानून आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता ते आपल्या व्यवसायात व नोकरीत कार्यरत आहेत.आपले विद्यार्थी अथवा पालक भेटले की त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करणे हा गुरुजींचा स्थायी भाव.
गुरुजी अध्यापक म्हणून मलगड, लाकूरवाडी माणगाव हुंबरवाडी येथे कार्यरत होते शेवटी मुख्याध्यापक म्हणून रामपूर, येथून सेवानिवृत झाले आपल्या तालुक्या बरोबर आजरा तालुक्यात ही उतम सेवा गुरुजीनी केली आहे .त्यांचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.आपल्या नातवाईका मध्ये हि तितकेचे हे आवडते व्यक्तिमत्व इतरांना मदतीचा हात नेहमी पुढे असणारे गुरुजी ज्यावेळी गल्लीतून जाणे -येणे असायचे त्यावेळी गल्लीत बसणाऱ्यांना"बेनकी काय बरं आहे ना!"अशी हाक कानावर हमखास असयची. अशी आस्थेवाईकपणे चौकशी करणारे गुरुजी बोलका स्वभावाचे होते.आपल्या मुलांच्या लग्नात गावाचा सहभाग कसा घ्यायचा व त्यांना आपल्या समारंभाचा साक्षीदार बनवायचे व आपल्या आनंदात त्यांनाही सामावून घ्यायचे हे सुद्धा गुरुजींच्या कडून घेणासारखा गुण आहे. गावात वाचनालय सुरू केले तेव्हा वस्तू रूपाने टेबल देऊन वाचनालयाला हातभार लावला.गावातील पारायणला नेहमी अर्थिक मदत. मंडळाना सहकार्य.
गुरुजीना प्रवासाची फार आवड शिक्षक आधिवेशन मध्ये नेहमी सहभागी होऊन प्रवसाचाआनंद घेणार .आरोग्याची काळजी घेणारे पण बेळगावला असताना जरा त्यांच्या गुड्घ्यात दुखापत झाली त्यांच्यावर रोबोटने शस्त्रक्रिया झाली.आणि गुरुजीच्या फिरण्यावर मर्यादा आल्या.लोकांचा काहीसा संपर्क कमी झाला.गावडे घरण्यातील एका जेष्ठ आणि जाणत्या व्यक्ति चे निधन झाले . पाटील घराण्यावर व माणगाव वर शोककळा पसरली.
ऋण निर्देश -
श्री.विरभद्र साताप्पा पाटील गुरुजी वय 86 वर्षे यांचे रविवारी दि.09 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 03 वाजून 20 मिनिटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व नातेवाईक,राजकीय,सामाजिक, वैद्यकीय,क्षेत्रातील व्यक्ती,मित्रपरिवार,ग्रामस्थ,यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा परिवार ऋणी आहे.
शोकाकुल परिवार :-
पत्नी श्रीमती सुगंधा विरभद्र पाटील.
मुलगा सौ. व श्री.डॉ.संजीव विरभद्र पाटील.
मुलगा सौ. व श्री.सुनील विरभद्र पाटील.
मुलगी श्रीमती सरोजनी सुभाष आसंगी.
मुलगी श्री. व सौ. सुवर्णा बसवराज महाळंक.
मुलगी श्री. व सौ.शैलजा अनिल शेट्टर.
समस्त पाटील परिवार वागराळे, मिश्रीकोटी,हुक्केरी, वाली, रुगे, पडलादे, होंगल, परमणे, वळगडे, मुराळ,साखरे, रगशेट्टी, पटणशेट्टी, होंबल,किणीकर, कळसणावर , गड्डी, देवगी, चौगला, धिंग, डांग, कुरंदकर, तेरणी, स्वामी, घुली,मठपती, व ग्रामस्थ माणगाव.

Post a Comment
0 Comments