Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू विकास आघाडी कडून दयानंद काणेकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

 


चंदगड/प्रतिनिधी : चदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक दयानंद काणेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडी पॅनेलकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.दयानंद काणेकर यांच्या नेतृत्वात प्राची काणेकर यांनी मागील 5 वर्षामध्ये अनेक लोकोपयोगी धाडसी निर्णय घेत चंदगड शहराचा कायापालट केला.तसेच सोबतचे सहकारी नगरसेवक व विरोधी नगरसेवक यांना विश्वासात घेत शहरांत विविध विकासकामे मार्गी लावली.


1)संभाजी चौक आणी नगरपंचायत कॉर्नर येथे बस थांबा स्थानक.

2)नदी घाट 

3) रामलिंग तळी 

4)नगरपंचायत इमारत 

5)शहरातील मुख्य रस्ते,गटार 

6)घरकुल योजना सुरू होण्यात येणार्‍या अडचणी सतत पाठपुरावा करून मंजुरी

7)हायमास्ट लॅम्प जागोजागी बसवले

8)अग्नीशमन गाडी यासह जवळपास 65 कोटींची कामे मागील 5 वर्षात पूर्णत्वास नेली.तसेच दयानंद काणेकर यांनी सभासदांना विश्वासात घेत चंदगड अर्बन बँक अडचणीतून बाहेर काढली. तोट्यात असणारी बँक आज नफ्यात आली.तसेच विविध स्पर्धा, महिलासाठी कार्यक्रम व युवावर्गासाठी ते नेहमी क्रिकेट स्पर्धां भरवून युवकांना प्रेरणा देतात.चंदगड शहरातील नागरिकांना आपलंस करणार नेतृत्व दयानंद काणेकर यांनी आपल्या कामातून लोकांमध्ये एक वेगळी छाप टाकली आहे.आजही चंदगड शहरामध्ये प्रत्येकाच्या हाकेला आणि मदतीला धावून जाणारा जनमाणसातील नेता अशी त्यांची ओळख आहे.तसेच वेळप्रसंगी विरोधकाला देखील ते अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तत्पर असतात.त्यामुळे विरोधक देखील त्यांचा आदर करतात.पदरमोड करून लोकांची कामे करण्यासाठी ते प्रचलित आहेत.राजकारणातील एक हूशार व प्रामाणिक व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आता पुन्हा एकदा ते चंदगड नगरपंचायतीच्या शाश्वत विकासासाठी रिंगणात उतरले आहेत.




"गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेचा अनुभव माझ्या पाठीशी असून लोकांच्या गरजा, प्रश्न लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लोकांसाठी मी नेहमी तत्पर असतो,शहरातील कोणत्याही वार्डात मी राजकारण न करता लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे,नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी सर्व नेत्याकडून आणून विकासकामे मार्गी लावण्यात आले आहेत,तर काही प्रलंबित कामे येणाऱ्या काळात मार्गी लागणार आहोत.यामध्ये आमच्या माजी नगरसेवकांनी व आमच्या सहकाऱ्यांनी महत्वाची जबाबदारी स्वीकारत या कामाना योगदान दिले आहे.आम्ही मंजूर केलेल्या कामाचे कोणीही श्रेय घेऊ नये.सत्ता असो वां नसो,येणाऱ्या काळातही आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी झटणार आहोत.आमच्या राजर्षी शाहू विकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य लोकांसाठी नेहमी तत्पर असेल,विकासाचं येणार नवीन व्हिजन व केलेली विकासकामे  हा मुद्ददा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ आणि त्यांचा विश्वास संपादन करू" 

 

अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना दयानंद काणेकर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments