शिंदे गटातील 17 पैकी 10 उमेदवारांची माघार-भाजपचेही दोन उमेदवार बाहेर
एकूण 60 उमेदवार रिंगणात; चुरशीची निवडणूक होणार
चंदगड, 21 नोव्हेंबर :– चंदगड नगरपंचायत निवडणुकीत आज मोठी राजकीय घडामोड घडली. तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच गजबजलेल्या वातावरणात शिंदे गटातील तब्बल 17 पैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली. तर भारतीय जनता पक्षातील दोन उमेदवारांनीही निवडणूक रणांगणातून अचानक माघार घेतल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
नगराध्यक्ष पदावर मोठा बदल – ६ जणांची माघार
नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचे मजबूत असे समजले जाणाऱ्या सहा उमेदवारांनी आज माघार जाहीर केली. यात प्राची दयानंद काणेकर, संजय कृष्णा चंदगडकर, झिशान अब्दुल सत्तार मुल्ला, जहांगीर महंमद पटेल, रमेश रवळोजी देसाई व तानाजी पांडूरंग देसाई यांचा समावेश आहे. या अचानक माघारीमुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणखी चुरशीची बनली आहे.
नगरसेवक पदातूनही मोठ्या प्रमाणात माघारी
नगरसेवक पदासाठीही शिंदे गट व भाजपच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. सुनिल हाजगुळकर, मनोहर गडकरी, सुधा गडकरी, रेणूका परिट, मुस्ताक अत्तार, युनुस नाईक, बाबू मंडलिक, अल्फिया मुल्ला, शिफा आगा, निहाल नाईक, रश्मी गुरबे, नेत्रदिपा कांबळे, निलेश सबनीस, मुसाब मंदार, मोसिन नाईक, श्वेता टोपले, अनुसया दाणी, राजीव चंदगडकर, जयश्री फाटक, सचिन राजापुरकर, दिलीप चंदगडकर, कीर्ती कदम, गुरूनाथ मंडलिक, धीरज पोशिरकर, चेतन शेरेगार, रमेश देसाई, माधुरी पवार, अल्ताफ मदार, संतोष ओऊळकर यांसह अनेकांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
आता रिंगणात उरलेले उमेदवार
– नगराध्यक्ष : 3
– नगरसेवक : 57
– एकूण रिंगणात : 60 उमेदवार
या प्रचंड प्रमाणातील माघारीनंतर चंदगड नगरपंचायत निवडणूक आता अत्यंत रोचक व चुरशीची होणार यात शंका नाही. पक्षांतर्गत चर्चांचे पडसाद, स्थानिक समीकरणे आणि अचानक झालेले निर्णय यामुळे पुढील काही दिवस राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments