चंदगड/प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाकडून हेरे पंचायत समिती दौरा करण्यात आला.या बैठकीत मार्गदर्शन करताना तालुका प्रमुख विष्णु गावडे यांनी या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि शिवसेना तालुक्यात मोठी करू असे प्रतिपादन केले.तर शिव सहकार सेना तालुका संघटक आनंद सोमाना शिंदे, एकनाथ वाके, ग्राहक संरक्षण सेना तालुका प्रमुख चंद्रकांत गावडे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी विभागप्रमुख सुशील दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक बाळकृष्ण बांदेकर, सुहास दरेकर, सीताराम सीताप, युवराज पाटील , बाबू सावंत, निवृत्ती गावडे, नामदेव गावडे,अशोक दळवी, नंदू पाटील व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments