चंदगड : धुमडेवाडी ता . चंदगड येथे पी.के.प्रोडक्शन निर्मीत,अनाथ लेकीला मायेची ऊब देण्यासाठी," आई भाड्याने देणे आहे" या शाॅट फील्मचे चिञीकरण पुर्ण झाले.आपणास घर , शाॅप ईतर काही गोष्ठी भाड्याने मीळतात.पण,आई भाड्याने देणे आहे हे ऐकताच अंगावर काटा येतो.या फील्मची कथानक खुप ह्दयस्पर्षी आहे.या फील्मचे निर्माते प्रकाश खरुजकर असुन लेखक व दिग्दर्शक शशिकांत पेडणेकर यांनी केले आहे.
चंदगड तालुक्यातील ग्रामीण कलाकारांनी ही फील्म बनवली आहे.यामध्ये मोनाली परब व पुजा सुतार प्रमुख भुमीकेत असुन साहील पाटील,गजानन कोकीतकर,सुभाष बागडी,युवराज पाटील,रुपाली कोकीतकर यांच्या भुमीका आहेत. तर चित्रीकरण कॅमेरामन स्वप्नील पाटील यांनी केले.लवकरच ही शॉट फील्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर आजच शाॅट फिल्मचा टीझर चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सर्वांनी नक्की पाहा असे आवाहन शशिकांत पेडणेकर यांनी केले.
टिझर लिंक -
https://youtu.be/ozYqhufNZpY?si=iInTkCWbcxhgYRGP

Post a Comment
0 Comments