(लाकडाची बचत, जंगल संरक्षण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अभिनव उपक्रम,वाईल्ड लाईफ कन्सर्वेशन ट्रस्टच्या सहकार्याने संपूर्ण गावाला अनुदानावर बंब वितरण)
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड तालुक्यातील जांबरे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी कमी लाकडात चालणाऱ्या बंबचे वितरण करण्यात आले. हा वितरण सोहळा संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, चंदगड तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांच्याहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री.ठोंबरे सर,ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा धन्वंतरी देसाई,वाईल्ड लाईफ कन्सर्वेशन ट्रस्टचे संचालक गिरीश परदेशी,सरपंच विष्णू गावडे,ग्रामसेवक अश्विनी कुंभार,वनपाल कृष्णा डेळेकर,कृषी सहाय्यक श्री.साबळे यासंह शालेय शिक्षक,कर्मचारी,तसेच जांबरे ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत अंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता लागणाऱ्या लाकडाचे प्रमाण कमी व्हावे, लाकडाची बचत व्हावी व जंगलतोड थांबावी, या उद्देशाने बंबचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे वाईल्ड लाईफ कन्सर्वेशन ट्रस्ट यांचे संचालक गिरीश परदेशी (पंजाबी) यांनी मोलाचे सहकार्य करत संपूर्ण गावाला अनुदानावर बंब उपलब्ध करून दिले.“झाडे लावा – जंगल वाचवा” या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून विकासाचा आदर्श नमुना समोर आला आहे.अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण, पर्यावरणपूरक व लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवून जांबरे ग्रामपंचायत तालुक्यात अग्रेसर ठरत आहे.



Post a Comment
0 Comments