Type Here to Get Search Results !

विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाहुन बारामतीकडे रवाना झाले होते.बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती व मानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला.त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला.हा अपघात भीषण स्वरुपाचा होता. हे विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यांच्या विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये अजित पवार यांच्यासह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.नियोजित सभांच्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांनी विमानतळ आण रुग्णालयाकडे धाव घेतली.प्रशासनाकडून तूर्तास संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या विमानाच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण याचा तपास करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments