अनेक गट व गणांतील लढतींचे चित्र स्पष्ट
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती चंदगड तालुका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत चंदगड तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमधून अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे मागे घेतली आहे. परिशिष्ट–६ अ (नियम २०(५)) नुसार तहसील कार्यालयामार्फत माघार घेणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवारी माघारी
गट क्रमांक ६५ – अडकूर
(आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गटातून एकूण आठ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये
कोमल लक्ष्मण नाईक (सत्तेवाडी, अडकूर),
मालन चंद्रशेखर गावडे (नागनवाडी),
माधवी मल्हारी देसाई (अडकूर),
रत्नप्रभा जयंत देसाई (अडकूर),
राजश्री तात्यासाहेब देसाई (शिरोली),
मोनाली मोहन परब (सातवणे),
सुनिता नामदेव बांदिवडेकर (नागनवाडी)
आणि संजीवनी सुरेश हरेर (इब्राहिमपूर) यांचा समावेश आहे.
या माघारीमुळे या गटातील निवडणूक लढत आता मर्यादित उमेदवारांमध्येच होणार आहे.
गट क्रमांक ६६ – माणगाव
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)
या गटातून रेणुका प्रकाश नरी (माणगाव) व गिता राणबा बामणे (निहूर) यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
गट क्रमांक ६७ – कुदनूर
(आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गटातून सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे.
त्यामध्ये अनिता तुकाराम कलखांबकर (कारवे),
सुजाता मारुती पाटील (कालकुंद्री),
सुजाता दिपक पाटील (ढोलगरवाडी),
प्रचिता प्रभाकर खांडेकर (शिनोळी खुर्द),
कमल आनंद देसाई (कागणी)
आणि नम्रता भरमाना पाटील (शिनोळी खुर्द) यांचा समावेश आहे.
गट क्रमांक ६८ – तुडये
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)
या गटातून अनिता विष्णू गावडे (हलकर्णी) यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
पंचायत समिती गणनिहाय उमेदवारी माघारी
गण क्रमांक १२९ – गवसे
(आरक्षण : अनुसूचित जाती – महिला)
या गणातून पल्लवी पांडुरंग कांबळे (बुझवडे) यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
गण क्रमांक १३० – अडकूर
(आरक्षण : सर्वसाधारण)
या गणात सर्वाधिक म्हणजे १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामध्ये नामदेव भिमान्ना सावंत, चंद्रशेखर भरमू गावडे, शिवदत्त सुभाष कोट, अशोक निंगाप्पा गडदे, मारुती नामदेव गुरव, बंडू गोपाळ चंदगडकर, गणेश लहू दळवी, रणजीत राजाराम देसाई, शैलेन्द्र विश्वासराव देसाई, संग्राम जिजासाहेब देसाई, धोंडीबा भागोजी नाईक, वसंत गणपती निकम, मोहन संतू परब, प्रकाश नारायण वाईगडे, राजेश मनोहर वाके व सुरेश कृष्णा हरेर यांचा समावेश आहे.
गण क्रमांक १३१ – माणगाव
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग)
या गणातून बाबू लक्ष्मण राजगोळकर, रामचंद्र ईश्वर चिंचणगी, संदिप वैजनाथ चिंचणगी, किरण बसवणी नाईक, विद्या सुरेश नाईक व मायाप्पा ईश्वर पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
गण क्रमांक १३३ – कुदनूर
(आरक्षण : सर्वसाधारण)
या गणातून तब्बल तेरा उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
त्यामध्ये प्रभाकर मारुती खांडेकर, धनंजय जोतिबा खवनेवाडकर, भैरू कृष्णा खांडेकर, पुंडलिक हणमंत गवसेकर, संदेश बाबुराव जाधव, पुंडलिक सटुप्पा नौकुडकर, दीपक रामकृष्ण पाटील, भरमाना यलाप्पा पाटील, भरमू तातोबा पाटील, विनोद परशराम पाटील, विजय रामू भांदुर्गे, शंकर धोंडीबा मनवाडकर व राजाराम महादेव मोहणगेकर यांचा समावेश आहे.
गण क्रमांक १३४ – तुर्केवाडी
(आरक्षण : सर्वसाधारण)
या गणातून दिपक रामकृष्ण पाटील, प्रताप गणपती पाटील, अशोक गणपती ओउळकर, शंकर लक्ष्मण ओउळकर, तानाजी परशराम कागणकर, हरिभाऊ रामचंद्र गावडे, गणपती शंकर पवार, गावडू अर्जुन पाटील, भरमाना महादेव पाटील व सागर यशवंत सोनार यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
गण क्रमांक १३५ – तुडये
(आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गणातून राजश्री हर्षवर्धन कोळशेकर, सुनिता सुधाकर गावडे, रेश्मा परशराम पाटील व रसिका महेश शिंदे यांनी माघार घेतली आहे.
गण क्रमांक १३६ – हेरे
(आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गणातून शारदा सुशिल दळवी, निता बाबू परीट, नंदिनी बळवंत पाटील, सुमन जकोबा पाटील, स्वाती विनोद पाटील, साक्षी विजय मोर्या, प्रतिभा युवराज शिंदे व मृणाल महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
उमेदवारी माघारीमुळे आता चंदगड तालुक्यातील अनेक गट व गणांमधील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याने प्रचाराला आता वेग येणार आहे.

Post a Comment
0 Comments