जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक २०२६ ची रणधुमाळी वेगात
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने चंदगड तालुक्यातील विविध गट व गणांमधून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गट क्रमांक ६५ – अडकूर
(आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गटातून भाजपच्या राजश्री लक्ष्मण गावडे (मु. जांबरे, पो. उमगाव) या उमेदवार असून त्यांना कमळ हे चिन्ह देण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शितल विठ्ठलराव देसाई (मु.पो. शिरोली) निवडणूक लढवत असून त्यांना हात चिन्ह देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलकनंदा अंबदास पाटील (मु.पो. कानूर खुर्द) या रिंगणात असून त्यांना घड्याळ चिन्ह मिळाले आहे.
निर्वाचन गण क्रमांक १२९ – गवसे
(आरक्षण : अनुसूचित जाती – महिला)
या गणातून मनस्विनी महादेव कांबळे (भाजप – कमळ),
रेणुका दीपक कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ)
आणि सिंधु अनंत कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – हात) या उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
निर्वाचन गण क्रमांक १३० – अडकूर
(आरक्षण : सर्वसाधारण)
या गणात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शिवाजी सतबा तुपट (हात),
राष्ट्रवादी काँग्रेसचे हणमंतराव दत्ताजीराव देसाई (घड्याळ),
भाजपचे रविंद्र नामदेव बांदिवडेकर (कमळ),
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उदय रावसाहेब मंडलिक (मशाल),
वंचित बहुजन आघाडीचे अंकुश गोपाळ कांबळे (गॅस सिलेंडर),
तर राष्ट्रीय समाज पक्षाचे दयानंद मारुती परीट (ट्रॅक्टर) निवडणूक रिंगणात आहेत.
गट क्रमांक ६६ – माणगाव
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)
या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसी कल्लाप्पा भोगण (मु.पो. कोवाड) व भाजपच्या मनिषा अनिल शिवनगेकर (मु.पो. माणगाव) यांच्यात थेट लढत होणार असून अनुक्रमे घड्याळ व कमळ ही चिन्हे देण्यात आली आहेत.
निर्वाचन गण क्रमांक १३१ – माणगाव
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग)
या गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास दत्तात्रय नाईक,
भाजपचे सागर मल्लिकार्जुन मुंगेरी,संतोष कृष्णा पाटील,
अपक्ष उमेदव निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवारांना गॅस सिलेंडर, चिन्हे देण्यात आली आहेत.
निर्वाचन गण क्रमांक १३२ – कोवाड
(आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला)
भाजपच्या सुवर्णा चंद्रकांत कुंभार (कमळ),
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गिता राणबा बामणे (घड्याळ),
तर अपक्ष उज्वला विलास नाईक (पाण्याची टाकी) या उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गट क्रमांक ६७ – कुदनूर (आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गटातून भाजपच्या ज्योती दीपक पाटील (मु.पो. बसर्गे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या विलास पाटील (मु.पो. बसर्गे) निवडणूक रिंगणात आहेत. भाजप उमेदवाराला कमळ तर राष्ट्रवादी उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह देण्यात आले आहे.
याच गटात अपक्ष व पक्षीय उमेदवार म्हणून
मधुकर हणमंत आंबेवाडकर (कुदनूर),
कमल आनंद देसाई (कागणी),
किरण कल्लापा कोले (कालकुंदी),
गजानन तुकाराम सुतार (होसूर)
यांचाही समावेश आहे.
गट क्रमांक ६७ – कुदनूर (आरक्षण : सर्वसाधारण)
या गटात भाजपचे शिवाजी जोतीबा तुपारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग कृष्णा बैनक (दोघेही मु.पो. मजरे कार्वे) यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपला कमळ तर राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळाले आहे.
गट क्रमांक ६८ – तुडये / तुङये
या गटातील विविध आरक्षणांनुसार उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत—
आरक्षण : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (गण १३५ तुडये)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रचना मष्णू गावडे व भाजपच्या स्वरा सचिन बल्लाळ या उमेदवार निवडणूक रिंगणात असून अनुक्रमे घड्याळ व कमळ ही चिन्हें त्यांना देण्यात आली आहेत.
गण १३५तुडये
आरक्षण : सर्वसाधारण महिला
भाजपच्या कोमल जोतीबा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमा जगन्नाथ हुलजी यांच्यात लढत होणार असून भाजपला कमळ व राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह देण्यात आले आहे.
गण क्रमांक १३६ – हेरे (आरक्षण : सर्वसाधारण महिला)
या गणातून भाजपच्या निर्मला अंकुश गवस (कळसगादे, तिलारीनगर), राष्ट्रवादी काँग्रेसच्या संज्योती संतोष मळवीकर (नांदवडे) व वंचित बहुजन आघाडीच्या मिनाक्षी मनोहर कांबळे (पारगड) निवडणूक लढवत आहेत. त्यांना अनुक्रमे कमळ, घड्याळ व गॅस सिलेंडर ही चिन्हे देण्यात आली आहेत.
चंदगड तालुक्यातील बहुतांश गटांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये थेट सामना होत असल्याने निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. येत्या काळात प्रचाराला वेग येणार असून स्थानिक विकास, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments