Type Here to Get Search Results !

विकासाबरोबर स्थानिक भागात मूलभूत सुविधा, उपक्रम राबविणार-माणगाव जि प भाजपा उमेदवार मनीषा शिवनगेकर


चंदगड प्रतिनिधी (रुपेश मऱ्यापगोळ) : माणगाव जिल्हा परिषद गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मनीषा शिवनगेकर यांनी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली असून त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी, वाडी वस्तीवर त्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत मतदारांशी संवाद साधत असून त्यांच्या या प्रचाराला महिला, युवक- युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरघोस पाठिंबा लाभत आहे. 

 

या प्रचार दौरा दरम्यान मनीषा शिवणगेकर यांनी स्थानिक विकास मूलभूत सुविधा महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्य विषयक प्रश्नावर भर देत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, बचत गटांना प्रोत्साहन आरोग्य शिबिरे असे विविध विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या आश्वासनामुळे महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी नागरिकांनी त्यांच्या या विकासात्मक विचारांना पाठिंबा दर्शविला. 

 

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त करून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे ही निवडणूक निश्चितपणे जिंकू असा ठाम विश्वास मनीषा शिवनगेकर यांनी व्यक्त केला.एकूणच माणगाव जिल्हा परिषद गणामध्ये मनीषा शिवनगेकर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून निवडणुकीचे वातावरण तापत चालल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments