चंदगड/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस व नेसरी जि.प.चे उमेदवार विद्याधर गुरबे यांना नेसरी भागातून मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.तळागाळातील भेटी देत गुरबे यांनी आपण केलेल्या विकासकामांचा अजेंडा पोचवत आहेत.खासदार छत्रपती शाहूराजे व सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भागातील विकासकामे मार्गी लावली आहेत.
नेसरी पंचक्रोशीमध्ये येणाऱ्या काळात भागातील विकासाला गती देऊ व स्मार्ट सिटीप्रमाणे नेसरी मतदारसंघाचा मोहरा बदलू अशी प्रतिक्रिया विद्याधर गुरबे यांनी दिली.गुरबे हे गडहिंग्लज,आजरा,चंदगड या तिन्ही तालुक्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.तसेच कॉग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर समर्थक असून जनतेच्या विविध कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.गोरगरिब जनतेच्या हक्केला धावून जाणारा नेता म्हणून पंचक्रोशीतील त्याची ओळख असून त्यांनी पंचायत समितीचे उप सभापती व गोड साखर कारखान्याचे संचालक पद सांभाळत लोकांना न्याय देण्याचा प्रयन्त केला आहे. सध्या या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Post a Comment
0 Comments