चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : चंदगड ते कोदाळी या मार्गांवर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी चंदगड शहरात बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर व चंदगड पंचायत समितीच्या उपसभापती संज्योती मळवीकर यांना सादर करण्यात आले. सध्या या मार्गावर बसस्थानकाची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना तासन्तास उन्हात व पावसात थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चंदगड शहरातील कोदाळी रोडवर योग्य ठिकाणी बसस्थानक उभारल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होईल, असेही दळवी यांनी सांगितले.या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर बसस्थानक उभारण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments