८ गाड्या जप्त, २.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील मोटारसायकल चोरी करणाऱ्या कॉलेज तरुणांच्या टोळीचा चंदगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विशेष तपास मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.अटक करण्यात आलेल्या आरोपी साईनाथ दत्तात्रय सावंत (रा.माणगाव ) याचा समावेश आहे.साईनाथ सावंत व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चंदगड परिसरासह इतर ठिकाणी मोटारसायकली चोरी करून कमी किमतीत विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या एकूण ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या सर्व गाड्यांची किंमत अंदाजे २.४५ लाख रुपये आहे. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये विविध कंपन्यांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment
0 Comments