चंदगड : माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर यांचे कनिष्ठ बंधू, तसेच जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांचे काका श्री.बापूसाहेब रखमाजीराव देसाई उर्फ बाळासाहेब कुपेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.
बाळासाहेब कुपेकर यांनी दौलत साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, राजा शिवछत्रपती महाविद्यालयाचे अध्यक्ष तसेच प्रतापराव गुजर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष म्हणून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ९ वाजता कानडेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment
0 Comments