Type Here to Get Search Results !

विराट हिंदू संमेलनाचे आयोजन; चंदगडात भव्य सोहळ्याची तयारी


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या भव्य संमेलनासाठी परिसरात जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


हे संमेलन गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री देव रवळनाथ मंदिर मागील पटांगण येथे होणार आहे. त्याआधी दुपारी ४ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौक ते श्री रवळनाथ मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प.पू. श्री भगवानगिरी महाराज (मठाधिपती, नुल मठ) व प.पू. श्री हरिगुरु महाराज (श्री रुद्र केसरी मठ सेवा समिती, बेळगाव) उपस्थित राहणार आहेत.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री मिलिंद केशव वाईकर (पुणे) मार्गदर्शन करणार असून, महिला वक्त्या म्हणून सौ. विजया वेसणेकर या उपस्थितांना संबोधित करणार आहेत.संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध पदाधिकाऱ्यांची समिती कार्यरत असून, संयोजक म्हणून श्री लक्ष्मण गावडे , सहसंयोजक श्री दयानंद काणेकर, सचिव श्री अतुल दाणी, सहसचिव श्री बापूसाहेब देसाई आणि कोषाध्यक्ष श्री जोतिबा पाटील आदी जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.या संमेलनात चंदगड तालुक्यातील विविध गावांतील नागरिक, सार्वजनिक मंडळे आणि संघटनांचा सहभाग अपेक्षित आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments