चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या संभाव्य टंचाईमुळे वाहनधारकांमध्ये घबराट निर्माण झाली असून तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. सकाळपासूनच नागरिकांनी पंपांवर गर्दी केली असून दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे.स्थानिकांच्या माहितीनुसार, इंधन उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने नागरिकांनी आगाऊ साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पंपांवर तणावाचे वातावरणही निर्माण झाले.
वाहनधारकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी कर्मचारी व स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी लागत आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपांवरील यंत्रणांवरही ताण आला आहे.दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे, असे आवाहन केले आहे. परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पुरेसा असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, व अफ़वाना बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जनतेला केले आहे.

Post a Comment
0 Comments