Type Here to Get Search Results !

पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज-दत्ता पाटील


 

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक वन दिन उत्साहात साजरा


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम दि न्यू इंग्लिश स्कूल व न.भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथे पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाची सुरुवात वनपाल तानाजी भोसले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षणाची गरज पटवून दिली.यावेळी "लावा झाडे, जगवा झाडे", "पाणी अडवा, पाणी जिरवा", "झाडे लावा घरोघरी, तरच बरसतील पावसाच्या सरी" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यानंतर मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल श्री दत्ता पाटील यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत सांगितले की,

"पर्यावरणाचा अभ्यास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न ठेवता, त्यासाठी प्रत्यक्ष चळवळ उभी करणे आवश्यक आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे."


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षलागवड व पर्यावरण जतनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी मानले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी सकारात्मक प्रेरणा मिळाली.

Post a Comment

0 Comments