Type Here to Get Search Results !

No title

 गॅस पुरवठा करणाऱ्या तसेच वितरित करणाऱ्या कंपनीकडून साठेबाजी व काळाबाजार करत ग्राहकांची होणारी फसवणूक व ऑनलाईन गॅस नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी बाबत




जगभरात आखाती देशातील युद्धाचा परिणाम लगतच्या सर्व देशामध्ये दिसून येत आहे. काही देशामध्ये लोकांचा जीवन मरणाचा संघर्ष सुरु झालेला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी खळबळ उडालेली आहे. या युद्धामुळे महाराष्ट्रातील दैनंदिन जीवनात लागणाऱ्या घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.अनेक ग्राहकांच्या मनात यामुळे भीती निर्माण झाली असून घरगुती वापरासाठी लागणारा गॅस मिळणे अवघड झालेले आहे. 


चंदगड ( कोल्हापूर) विभागातील गॅस वितरण कंपनीचा त्रास विभागातील अनेक ग्राहकांना सहन करावा लागत असल्याचे आमच्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.


१. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून साठेबाजी होत असल्याचे दिसून आले आहे.


२. ग्राहकांनी गॅस नोंदणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर ओ टी पी क्रमांक वेळेवर येत नसल्यान े नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. चंदगड तालुक्यातील अनेक गावे हि दुर्गम भागात असल्याने या विभागांमध्ये अनेकदा वीज नसते किंवा मोबाइल टॉवर अधिक प्रमाणात नसल्यान े अनेकदा मोबाइलला नेटवर्क नसते. अश्या परिस्थतीत ऑनलाईन पद्धतीन े रजिस्ट्रेशन करणे ग्रामस्थांना बऱ्याचदा अडचणीचे ठरते. अनेकदा नेटवर्क नसल्यान े गॅस बुकिंग झाली आह े कि नाही हेही समजत नाही. दुर्गम गावातील अनेक ग्रामस्थ तसेच वयोवृद्ध लोकांचा सहानुभूती पूर्वक विचार करून गॅस नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीन े करावा.


3. ग्राहकांनी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीला कॉल केला असता कॉल लागत नाही तसेच काही वेळा कोणतेही योग्य उत्तर मिळत नाही.


४. काही गॅस पुरवठा करणाऱ्य ा एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार केला जात असून यासाठी आह े असे दिसून येते.


५. आजकाल गॅस एजन्सी कडून गॅस पुरवठा व वितरण करण्याच्या नियमात बदल केलेले आले आहेत ज्यामुळ े त्याचा वास अनेक नागरिकांना झालेला आहे.


६. देशामध्य े आज गॅस पुरवठामध्य े तुडवडा निर्माण झाला आह े त्यामुळ े आज अनेक हॉटेल बंद तसेच काही सामान्य ग्राहकाच्या घरी चूल बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आजकाल मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये गॅस पुरवठा नसल्यान े हॉटेल बंद करण्याची वेळ आली आह े त्यामुळ े ग्राहकांची उपासमार होत आहे. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळ े बेरोजगारी वाढणार आहे.


तरी वरील कंपनीकडून साठेबाजी करून गॅस वितरण करणाऱ्या वितरकांची सखोल चौकशी करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments