Type Here to Get Search Results !

कोवाड येथे “साहित्य आणि सामाजिक बदल” कार्यशाळा उत्साहात संपन्न


कोवाड (प्रतिनिधी) : कोवाड. ता. चंदगड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत “साहित्य आणि सामाजिक बदल” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. व्ही. पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका डॉ. सुनीता कांबळे यांनी केले.


या कार्यशाळेत डॉ. एन. के. पाटील, डॉ. आर. के. सूर्यवंशी आणि डॉ. आनंद बल्लाळ यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी साहित्य आणि सामाजिक परिवर्तन यातील परस्परसंबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. के. कांबळे होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. आर. डी. कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच संजना व्हकाळी, शीतल निर्मळकर आणि संजना सुतार यांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेतील अनुभव मांडले.यावेळी डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. सरिता मोटरचे, प्रा. संतोष माने, डॉ. सरिता बिडकर, डॉ. व्ही. के दळवी, प्रा. ए. जे. पाटील यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मुकेश कांबळे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यशाळा ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली.

Post a Comment

0 Comments