मुंबई : विश्व ब्राह्मण समाज संघ आणि अनंत सेवा न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अटल गौरव सन्मान’ यंदा मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व ब्राह्मण समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच मध्य प्रदेश शासनाचे माजी राज्यमंत्री (दर्जाप्राप्त) पंडित योगेंद्र महंत यांनी ही माहिती दिली. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, या सन्मानासाठी इच्छुकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या असून, १५ जुलै २०२६ ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा जुलैच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असून, कार्यक्रमासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या सन्मानासाठी इच्छुकांनी आपली प्रवेशिका व सविस्तर प्रोफाइलसह १५ जुलैपर्यंत vishwabrahmansamajsangh61@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments