रामदास इंगवले यांच्या जागी स्वीकारला पदभार
गडहिंग्लज प्रतिनिधी | कविता मऱ्यापगोळ : गडहिंग्लज विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी विवेक पाटील यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे कार्यरत होते. रामदास इंगवले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी पाटील यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला.विवेक पाटील हे २०२२ बॅचचे अधिकारी असून, बुलढाणा येथे त्यांनी प्रोबेशन कालावधी पूर्ण केला आहे. प्रशासकीय अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सेवाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर त्यांनी गडहिंग्लज विभागाची जबाबदारी स्वीकारली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांशी समन्वय साधून काम करण्यावर भर देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या नियुक्तीमुळे गडहिंग्लज विभागातील पोलिस प्रशासनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments