चंदगड प्रतिनिधी | भरमु शिंदे : महाराष्ट्र माझा 24 लाईव्ह न्यूज यांच्यावतीने कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनिल सदानंद पाटील रा. सुरुते ता.चंदगड यांची महाराष्ट्र माझा 24 लाईव्ह न्यूज कॅमेरामन( छायाचित्रकार ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.चॅनेलचे संपादक ज्ञानेश्वर पाटील यांनी उपसंपादक भरमु शिंदे यांच्या शिफारशीनुसार अनिल पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
अनिल पाटील यांनी सामाजिक निस्वार्थी भावनेने अनेक कार्य पार पाडली आहेत,गोरगरिबांना मदत करत अन्यायाला वाचा फोडत समाज कार्य करत असतात.शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा समोर ठेवून अनेक अडचणींना तोंड देत कॅमेरामन या पदी निवड झाली आहे.त्याचबरोबर कुमार विद्या मंदिर सुरुते शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य पदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी उपस्थित शंकर शिंदे, मारुती बाबू भाटे, गजानन कांबळे, परेश पाटील,महेश कांबळे, बाळू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments