Type Here to Get Search Results !

किल्ले कलानिधीगडावर दुर्गवीरांची श्रमदान मोहीम उत्साहात

 


चंदगड : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले कलानिधीगडाच्या संवर्धनाचे कार्य सुरू आहे. या संवर्धन कार्याला दुर्गप्रेमींचा सातत्याने प्रतिसाद मिळत असून, गडावर विविध उत्सवही उत्साहात साजरे केले जातात.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून किल्ले कलानिधीगडावरील मंदिर परिसरात स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्गवीर मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहभागी दुर्गवीरांनी मंदिर परिसर तसेच गडावरील परिसराची स्वच्छता करून श्रमदान केले.


ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने दुर्गवीर प्रतिष्ठानकडून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. कलानिधीगडाच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या कार्यामुळे गडाच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यास हातभार लागत आहे.दुर्गवीर प्रतिष्ठान, कोल्हापूर व चंदगड यांच्या या उपक्रमाचे दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमींकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments