Type Here to Get Search Results !

ढोलगरवाडी येथे नागपंचमीनिमित्त सर्प जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!

 


​ढोलगरवाडी (प्रतिनिधी): ​ढोलगरवाडी येथे नागपंचमीनिमित्त गेल्या ६० वर्षांची परंपरा कायम राखत सापांविषयी शास्त्रीय माहिती व जनजागृतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात सत्यशोधक आद्यसर्पमित्र स्वर्गीय बाबुराव टक्केकर सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.​कारवे वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.या कार्यक्रमास ग्रामस्थ, सर्पप्रेमी आणि शाळेच्या घटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


​मान्यवरांची व वनविभागाची विशेष उपस्थिती-


​या कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शीतल पाटील (वनपरिक्षेत्र अधिकारी, पाटणे विभाग),जॉन्सन डिसुझा (वनपाल, कार्वे),मौला मुबारक (वनरक्षक, कार्वे),साक्षी सत्कार (वनरक्षक, चिंचणे),तुकाराम गुरव (वनसेवक, कार्वे) तसेच आर.आर.टी. (RRT) सदस्य चाळोबा कनगुटकर, कृष्णा मुळीक,सुरेश गावडे, शुभम बांदेकर यांच्यासह ​बेळगावचे प्रसिद्ध सर्पमित्र आनंद चिट्ठी, सर्पमित्र सुष्मिता नेसरीकर, सर्पमित्र कृष्णा पाटील यांच्यासह चंदगड तालुक्यातील अनेक नामवंत सर्पमित्र या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते.


​विद्यार्थ्यांचा सहभाग व सादरीकरण-

मामासाहेब लाड विद्यालय शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गावचे नागरिक यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये सापांची माहिती देणारे पोस्टर्स व तक्के लावून उपस्थितांना सापांबद्दल शास्त्रीय माहिती अत्यंत आत्मविश्वासाने समजावून सांगितली.​सर्प संरक्षणाची प्रतिज्ञा: कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी आणि नागरिकांनी "साप निसर्गात सुरक्षित राहतील आणि त्यांचे संरक्षण केले जाईल," अशी प्रतिज्ञा घेतली.​गेल्या ६० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही मामासाहेब लाड विद्यालय आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली, ज्यातून पर्यावरण व सर्प संवर्धनाचा एक उत्तम संदेश देण्यात आला.

Post a Comment

0 Comments