Type Here to Get Search Results !

हलकर्णी फाट्यावर ‘न्यू गारवा गार्डन’ची पर्वणी!


फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग व पार्टी हॉलची सुविधा; २४ सप्टेंबरला शुभारंभ


चंदगड प्रतिनिधी : बेळगाव–वेंगुर्ला मार्गावरील हलकर्णी फाटा येथे पेडणेकर परिवाराच्या पुढाकारातून साकारलेल्या ‘हॉटेल न्यू गारवा गार्डन’चा शुभारंभ गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर सुरू होणाऱ्या या हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग आणि पार्टी हॉल अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


चंदगड तालुक्यातील नागरिक, प्रवासी, व्यावसायिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांना भोजन व निवासाची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘न्यू गारवा गार्डन’ची उभारणी करण्यात आली आहे. कुटुंबासह भोजनासाठी आरामदायी वातावरणासह प्रवाशांसाठी लॉजिंगची सुविधाही येथे उपलब्ध राहणार आहे.वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम, स्नेहमेळावे, बैठका तसेच विविध समारंभांसाठी प्रशस्त पार्टी हॉलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह प्रवाशांसाठी हे नवे ठिकाण सोयीचे ठरणार आहे.


श्रींच्या कृपाशीर्वादाने व ग्राहकांच्या सदिच्छेने सुरू होत असलेल्या या नव्या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन संचालक संपत पेडणेकर व परिवारातर्फे करण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments